सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८

`सकाळ माध्यम समूहा`च्या वतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या चित्रकला स्पर्धेची महाराष्ट्रभर ख्याती आहे. गेली ३२ वर्षे सातत्याने ही स्पर्धा होत आहे. या वर्षी ३३ वी चित्रकला स्पर्धा १६ डिसेंबरला होईल.

`सकाळ`ने गेल्या काही वर्षात सातत्याने बदल घडवून आणणाऱ्या कार्यक्रमांचा आणि योजनांचा पाठपुरावा केला आहे. `सकाळ`च्या पुढाकारामुळे अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे बदल घडले आहेत. लोकांच्या सहभागातून सामाजिक तसेच सांस्कृतिक बदल घडवून आणणे, हा आमच्या दृष्टिकोनाचा भाग आहे. आपल्यासारख्या अनेकांच्या सहभागाशिवाय हा टप्पा गाठणे अवघड होते. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठीच चित्रकला स्पर्धेची सुरवात झाली. या कल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गेली काही वर्षे, दरवर्षी पाच लाखांहून अधिक मुले या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सहभागी शाळांच्या मुख्याध्यापकांनी `सकाळ`च्या उपक्रमांवर दाखविलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे.

मुले हेच आपले भविष्य आहे, यावर `सकाळ` परिवाराचा विश्वास आहे. याच विचारातून `सकाळ`ने मुलांसाठी `सकाळ एनआयई` आणि `सकाळ यंगबझ` यासारखी प्रकाशने सादर केली. याबरोबर मुलांना शिक्षणाबरोबर मनोरंजनाचा आनंद देतािना त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन `सकाळ`च्या वतीने केले जाते. डिजिटल युगाचा प्रभाव वाढत असताना चित्रकला स्पर्धेने मागील वर्षी एक नवे पाऊल टाकून, ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे. प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी जाऊ न शकणाऱ्या असंख्य मुलांना, आपली चित्रे ऑनलाईन पाठवून या वर्षीही स्पर्धेत भाग घेता येईल.

मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक असलेली मूल्य जपत मुलांची वाढ होण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. कलेची आराधना हा फक्त प्रयत्न नसून, एक अनोखी भेट आहे. आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असे हे सांस्कृतिक संचित आहे.

धन्यवाद

कळावे,

मृणाल पवार

संचालिका, सकाळ माध्यम समूह

१) कोणत्याही गटासाठी रंगसाहित्याच्या विशिष्ट माध्यमाचे बंधन नाही. चित्र कोणत्याही रंगसाहित्याने रंगवावे.

२) स्पर्धेचा निकाल जानेवारी २०१९ मध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ‘सकाळ’मधून जाहीर केला जाईल.

३) त्यानंतर पुणे विभागीय आणि राज्य पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आणि चित्रांचे प्रदर्शन पुणे येथे आयोजित करण्यात येईल.

४) ककेंद्र पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांची बक्षिसे आणि प्रशस्तिपत्रके संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडे पोचविण्यात येतील. संबंधित शाळांनी समारंभपूर्वक ही बक्षिसे यशस्वी विद्यार्थ्यांना द्यावीत, अशी विनंती आहे.

५) स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना किंवा शाळेला कोणतीही प्रवेश फी नाही. चित्र काढण्यासाठी कागदही ‘सकाळ’तर्फे दिला जाईल. रंगसाहित्य मात्र ज्याचे त्याने आणावयाचे आहे.

६) स्पर्धा होणाऱ्या प्रत्येक केंद्रातील स्पर्धा-स्थळाचे सविस्तर नाव, पत्ते आणि स्पर्धेच्या गटवार वेळा ‘सकाळ’मधून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केल्या जातील.

७) विद्यार्थ्याने त्याच्या गावा/घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहून स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे.

८) स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी शाळेमार्फत नजीकच्या 'सकाळ' कार्यालयात पाठवावी. chitrakala@esakal.com येथे आपण ई-मेल द्वारे सुद्धा यादी पाठवू शकता.